Home ठळक बातम्या कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार रॅलीना उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार रॅलीना उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ समितीच्या वतीने कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठिंबा

डोंबिवली दि.11 मे :
कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराचा धडाका सध्या सुरू आहे. एकीकडे वैयक्तिक भेटीगाठींसोबत थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काढण्यात येणाऱ्या प्रचार रॅलीना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांत अंबरनाथ, उल्हासनगर दिवा आणि काल डोंबिवलीत काढण्यात आलेल्या रॅलीना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ज्यामध्ये भाजप, मनसे, रिपाई या महायुतीतील घटक पक्षांचे सर्व प्रमूख पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होत आहेत. दरम्यान लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ समितीच्या वतीने कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना काल जाहीर पाठिंबा देण्यात आला.

कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे हे तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असून गेल्या १० वर्षात कल्याण लोकसभेत केलेल्या विकासकामांचे प्रगतीपुस्तक मतदारांसमोर ठेवून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याच विकासकामांच्या जोरावर डॉ. शिंदे विक्रमी मताधिक्याने हॅटट्रिक करतील असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटत असून वैयक्तिक भेटीगाठीसोबतच रॅलीद्वारेही प्रचार सुरू आहे. काल डोंबिवली पश्चिमेत निघालेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांचा वर्षाव करत श्रीकांत शिंदे यांचं स्वागत करण्यात आलं. येथील युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांच्या कार्यालयापासून निघालेली ही रॅली भाजपचे शैलेश धात्रक आणि मनिषा धात्रक या स्थानिक लोप्रतिनिधी दाम्पत्याच्या विष्णूनगर गणेश मंदिर परिसरात समाप्त झाली.

रॅलीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, मनसे आमदार राजू पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश म्हात्रे, रिपाइं जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह महायुतीच्या सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकनेते दि. बा. पाटील यांना मानणाऱ्या प्रत्येकाने डॉ. श्रीकांत शिंदेंना मत द्यावे, हीच दि.बा. यांना खरी श्रद्धांजली

लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव मंजूर करून केंद्राकडे पाठवला आहे. त्यामुळे दि. बा. पाटील यांना मानणाऱ्या प्रत्येकाने आपले मत डॉ. श्रीकांत शिंदे यांनाच द्यावे, हीच दि. बा. पाटील यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन लोकनेते दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी केले. अखिल भारतीय आगरी समाज परिषद आणि लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ समितीच्या वतीने कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. यानंतर डोंबिवली येथे माध्यमांना प्रतिक्रिया देताना अतुल पाटील यांनी हे आवाहन केले.

यापूर्वीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यायला ते तयार नव्हते. त्यांचे सरकार अल्पमतात आल्यानंतर त्यांनी नाईलाजाने घाईघाईत मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केला, मात्र त्याला कायदेशीर मान्यता नव्हती. मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होताच त्यांनी हा ठराव विधानसभा आणि विधानपरिषदेत बहुमताने मंजूर करून घेतला आणि केंद्राकडे पाठवला. आता केंद्र सरकारही याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास अखिल भारतीय आगरी समाज परिषद आणि लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ समितीचे सदस्य, आगरी समाजातील ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. तसेच फक्त विमानतळच नव्हे, तर कोकण पट्ट्यातील आमचे सगळे प्रश्न सोडवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे आज डॉ. श्रीकांत शिंदे हे निवडणुकीला उभे असताना आम्हाला ज्यांनी पाठिंबा दिला, त्यांना पाठिंबा देणे हे आमचे कर्तव्य असल्याची भावना रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केली.

आगरी समाजाला एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामुळे खऱ्या अर्थाने बळ मिळाल्याचेही ते म्हणाले. तसेच आमचा आगरी समाज म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे यांना भक्कम पाठिंबा असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. याप्रसंगी अखिल भारतीय आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील, लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ समितीचे अध्यक्ष अतुल पाटील, आगरी समाजातील ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर, गुलाब वझे, विनोद म्हात्रे, दशरथ भगत, बंडू पाटील यांच्यासह आगरी समाजातील मान्यवर आणि नेते उपस्थित होते. आगरी समाजाच्या पाठिंबामुळे डॉ. श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास याप्रसंगी आगरी समाजाच्या नेत्यांनी व्यक्त केला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा