Home ठळक बातम्या आंतरराष्ट्रीय सायकल आणि पर्यावरण दिनानिमित्त आयोजित सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

आंतरराष्ट्रीय सायकल आणि पर्यावरण दिनानिमित्त आयोजित सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पर्यावरण रक्षणाचा संदेश देत 400 हून अधिक सायकलपटू झाले सहभागी

कल्याण दि.४ जून:
आंतरराष्ट्रीय सायकल आणि पर्यावरण दिनानिमित्त कल्याणात आयोजित सायकल रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि बी.के. बिर्ला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ही सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती.

बिर्ला महाविद्यालयाच्या प्रांगणापासून सुरुवात झालेली ही सायकल रॅली मुरबाड रोड, बाईचा पुतळा, वालधुनी, विठ्ठलवाडी, चक्कीनाका, गोविंदवाडी, दुर्गाडी आधारवाडी मार्गे पुन्हा बिर्ला महाविद्यालयात येऊन समाप्त झाली. यात सहभागी झालेल्या सायकलपटुंनी झाडे लावा झाडे जगवा, कापडी पिशव्या वापरा, पाणी अडवा, कचऱ्याचे वर्गीकरण करा आदी सामाजिक संदेश असणारे बोर्ड लावले होते. विशेष म्हणजे ६ वर्षांपासून ते ६५ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील नागरिक या सायकल रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेशचंद्र, केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नरेश चंद्र, महापालिका सचिव संजय जाधव, कल्याण आयएमएचे माजी अध्यक्ष प्रशांत पाटील, उपायुक्त अतुल पाटील, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, नरेंद्र राठोड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या उपक्रमात कल्याण सायकलिस्ट फाउंडेशन, डोंबिवली सायकलिस्ट ग्रुप, हिरकणी महिला सायकलिस्ट ग्रुप, पलावा सायकलिस्ट ग्रुप, टीम बाईक पोर्ट आदी सायकल ग्रुपचे अनेक सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

या सायकल रॅलीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासह निरोगी आयुष्याचा संदेशही दिला गेल्याची माहिती नोडल अधिकारी आणि कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली. तसेच नागरिकांनीही अधिकाधिक सायकलींचा वापर करून वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा