Home क्राइम वॉच अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्येने कल्याण पूर्व हादरले

अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्येने कल्याण पूर्व हादरले

 

कल्याण दि.17 ऑगस्ट :
आपल्या आईसोबत असणाऱ्या अल्पवयीन मुलीची तरुणाने निर्घृणपणे केलेल्या हत्येने कल्याण पूर्व हादरले आहे. बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तर या घटनेनंतर माथेफिरू तरुणाला आजूबाजूच्या लोकांनी पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले. (The brutal murder of a minor girl shook Kalyan East)

कल्याण पूर्वेत राहणारी ही मुलगी आपल्या आईसोबत फेरफटका मारायला बाहेर पडली होती. तो संपवून घरी परतत असताना त्यांच्या इमारतीच्या आवारातच हा धक्कादायक प्रकार घडला. इमारतीच्या पायऱ्या चढत असताना पाठीमागून अचानक आलेल्या या तरुणाने धारदार शस्त्राने या अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला केला. ज्यामध्ये ही मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारादरम्यान तिचा मृत्य झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दरम्यान यावेळी आई आणि या मुलीचा आरडाओरडा ऐकून जमलेल्या स्थानिक नागरिकांनी या हल्लेखोर तरुणाला पकडुन कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच हल्ला केल्यानंतर या तरुणाने फिनेल प्यायलायची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मात्र या प्राणघातक हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. कोळसेवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. तर कल्याण डोंबिवलीतील वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत शहरांतील प्रतिष्ठीत नागरिकांसह सामान्य नागरिकांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा