Home ठळक बातम्या कल्याणात बसचा ब्रेकफेल ; सोसायटीची संरक्षक भिंत तोडून बस कोसळली गाड्यांवर

कल्याणात बसचा ब्रेकफेल ; सोसायटीची संरक्षक भिंत तोडून बस कोसळली गाड्यांवर

कल्याणच्या गोदरेज हील परिसरातील घटना

कल्याण दि. 27 एप्रिल :
बसचा ब्रेकफेल होऊन ती सोसायटीची संरक्षक भिंत तोडून थेट गाड्यांवर कोसळल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेच्या गोदरेज हील परिसरात घडली. यामध्ये कोणाला दुखापत झाली की नाही याची नेमकी माहिती मात्र समजू शकली नाही.

 

गोदरेज हिल परिसरात सोसायटीच्या रहिवाशांसाठी खासगी ट्रॅव्हल्सकडून बस चालवली जाते. आज संध्याकाळी गोदरेज हीलवरून खाली उतरत असताना या मार्गावर असणाऱ्या एका वळणावर हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. खाली येत असताना अचानक बसचे नियंत्रण सुटले आणि खाली असणाऱ्या मलबारी सोसायटीची संरक्षक भिंत तोडून ही बस तिथल्या गाड्यांवर कोसळली.

 

बसचे ब्रेकफेल झाल्याने हा अपघात झाला असून सोसायटीतील 2-3 गाड्यांचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती खडक पाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. एस. पाटील यांनी एल एन एन शी बोलताना दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा