Home ठळक बातम्या सर्वाधिक काळ सत्ता देणारी कल्याण डोंबिवली शहरं सेनेकडून उपेक्षितच विधानपरिषद विरोधीपक्ष नेते...

सर्वाधिक काळ सत्ता देणारी कल्याण डोंबिवली शहरं सेनेकडून उपेक्षितच विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांचा हल्लाबोल

 

डोंबिवली दि.11 जुलै :
मुंबई-ठाणे असो की कल्याण डोंबिवली…ज्या शहरांनी शिवसेनेला सर्वाधिक काळ सत्ता उपभोगण्याची संधी दिली त्यांनाच शिवसेनेने विकासाच्या बाबतीत उपेक्षित ठेवल्याची टिका विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी डोंबिवलीत केली. डोंबिवलीत झालेल्या पत्रकार परिषदेत दरेकर यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला.

कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अनेक प्रकल्प अर्धवट धूळ खात पडले आहेत. राज्यात आज शिवसेनेची सत्ता आहे. ठाण्यात पालकमंत्रीपद शिवसेनेकडे आहे, कल्याणात खासदार शिवसेनेचा आहे, महापालिकेमध्ये त्यांची सत्ता आहे. मात्र एवढं सगळं असूनही कल्याण डोंबिवलीत विकासाच्या नावाने बोंबच असल्याची टिका दरेकर यांनी केली.

तर कोवीड लसीचे 2 डोस घेऊन झालेल्या प्रवाशांना लोकलच्या रेल्वे प्रवासाला मुभा देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. याठिकाणी मोठ्या संख्येने कामगारवर्ग राहत असून लोकल प्रवास बंद असल्याने त्यांना प्रचंड आर्थिक संकटांना तोंड द्यावेसे वाटत आहे. त्यामुळे कर्जत-कसारा, कल्याण डोंबिवलीतील लसीकरण झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देणं गरजेचं असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

तसेच एकीकडे जर खासगी रुग्णालयात लस उपलब्ध होतेय तर मग कल्याण डोंबिवली महापालिका का नाही करू शकत ? असा सवाल विचारत लसीकरणामध्ये कल्याण डोंबिवली महापालिका अपयशी ठरल्याचे सांगितले.
दरम्यान या पत्रकार परिषदेत प्रविण दरेकर यांनी शिवसेना, महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढविला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा