Home ठळक बातम्या नेमबाजी स्पर्धांमध्ये डोंबिवलीचा नावलौकीक वाढवणाऱ्या ‘त्या’ दोघींचा गौरव

नेमबाजी स्पर्धांमध्ये डोंबिवलीचा नावलौकीक वाढवणाऱ्या ‘त्या’ दोघींचा गौरव

 

डोंबिवली दि.24 सप्टेंबर:
आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या डोंबिवलीकर कन्यांचा काल शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने गौरव करण्यात आला.

नमिता पाटील आणि भक्ती खामकर असे या दोघा मुलींची नावे आहेत. नमिता पाटीलने मुंबईत नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत 25 मीटर पिस्तुल प्रकारात 300 पैकी 262 गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला. तर भक्ती खामकरने खेलो इंडिया स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश संपादन केले आहे. त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल त्यांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप देण्यासाठी शिवसेना पदाधिकारी रमेश म्हात्रे यांनी हा सत्कार सोहळा आयोजित केला होता.

नमिता आणि भक्ती या दोघीही केवळ डोंबिवली नव्हे तर महाराष्ट्राचा गौरव आहेत. अत्यंत दृढनिश्चय आणि चिकाटीने आज त्या इथपर्यंत आलेल्या आहेत. त्यांना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा असून या दोघींना प्रोत्साहन देण्यासाठी हा सोहळा साजरा केल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. तसेच आम्ही खंबीरपणे या दोघींच्या पाठीशी असून येत्या काळात त्या आपल्या डोंबिवलीचे, राज्याचे आणि देशाचे नाव निश्चितच मोठे करतील असा विश्वास रमेश म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केला.

तर या गौरव सोहळ्याने भारावून गेलेल्या नमिता आणि भक्तीने सर्वांचे आभार मानत पालकांनी मुलींच्या पाठीशीही तितक्याच खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा