Home Uncategorised या विशेष मुलांच्या आनंदरंगात न्हाऊन निघाला ‘रासरंग’

या विशेष मुलांच्या आनंदरंगात न्हाऊन निघाला ‘रासरंग’

डोंबिवली दि.19 ऑक्टोबर :

डोंबिवलीतील खासदार डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित रासरंग-२०२३ हा काल सर्वार्थाने संस्मरणीय असा ठरला. यावेळी उपस्थित असलेल्या विशेष पाहुण्या मुलांच्या आनंदरंगात कालचा रासरंग न्हाऊन निघाल्याचे दिसून आले.

नवरात्रौत्सव हा केवळ गरब्याचा उत्सव नाही. या सोहळ्यात उत्साह आहेच, पण मने जोडणाऱ्या मानसिकतेचा एक अतूट धागाही या उत्सवाने गुंफला आहे. आणि हाच धागा पकडत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे विशेष मुलांना, विशेष पाहुण्यांचा मान देण्यात आला होता. या साऱ्यांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरत, त्यांच्या सुरात सूरही मिसळला. आणि रासरंग या विशेष मुलांनी उधळलेल्या आनंदरंगात रासरंग न्हाऊन निघाला.

तर या विशेष मुलांच्या निरागस चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहता त्यांच्याशी संवाद साधतानाचा क्षणही विशेष समाधान देणारा ठरला अशी भावनिक प्रतिक्रिया आयोजक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा