Home ठळक बातम्या चांगल्या कामांच्या माध्यमातून युवकांशी जोडण्याचा प्रयत्न – भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वैभव...

चांगल्या कामांच्या माध्यमातून युवकांशी जोडण्याचा प्रयत्न – भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड

 

कल्याण दि.18 ऑक्टोबर :
युवकांसाठी रोजगारनिर्मिती, व्यसनमुक्ती आदी चांगल्या कामांच्या माध्यमातून युवकांशी जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत भाजपच्या कल्याण जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष वैभव गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर वैभव गायकवाड यांनी आज प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधत भविष्यातील आपल्या वाटचालीची दिशा स्पष्ट केली.

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आपले वडील आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जनहिताची सर्व कामे करण्याची आपली इच्छा आहे. यासोबतच युवकांना रोजगार निर्मिती, चांगल्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासह व्यसनमुक्तीपासून युवा वर्गाला दूर ठेवण्यासाठी आपण काम करणार आहोत. जेणेकरून युवा वर्गामध्ये चांगले वातावरण निर्माण होऊन त्यांच्याशी जोडले जाण्याचा आपला प्रयत्न असेल असेही वैभव गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

तर युवकांना रोजगार नसल्याने ते व्यसनाकडे वळत आहेत आणि व्यसनाधीनतेमधून मग गुन्हेगारी क्षेत्राकडे त्यांची वाटचाल होत असून त्यामुळे गुन्हेगारी वाढली असल्याचे निरीक्षण त्यांनी यावेळी नोंदवले.

तसेच आताशी कुठे आपल्या राजकारणाची सुरुवात झाली असून अद्याप आपल्याला भरपूर काही शिकायचे आहे. तर पक्षश्रेष्ठी आपल्याला जी जबाबदारी देतील किंवा जे सांगतील ती जबाबदारी आपण नक्कीच स्विकारू असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा