Home ठळक बातम्या डोंबिवली पूर्वेतही सुरू झाला ‘शिवभोजन थाळी’ उपक्रम; पहिल्याच दिवशी अनेक गरजूंनी घेतला...

डोंबिवली पूर्वेतही सुरू झाला ‘शिवभोजन थाळी’ उपक्रम; पहिल्याच दिवशी अनेक गरजूंनी घेतला लाभ

 

डोंबिवली, दि.2 मे :
शिवसेना डोंबिवली शहर शाखेच्यावतीने डोंबिवली पूर्वेतही ‘शिवभोजन थाळी’ उपक्रम सुरू करण्यात आला. कल्याण जिल्हाप्रमुख प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. (The ‘Shiva Bhojan Thali’ initiative was also started in Dombivali East; On the first day, many needy people took advantage)

शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या पुढाकाराने शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शहर शाखेत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ही शिवभोजन थाळी दररोज सकाळी 11;30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत गरजू व्यक्तींना मोफत देण्यात येणार असल्याची माहिती शहरप्रमुख राजेश मोरे यांनी दिली. तर कोरोना काळामध्ये ही शिवभोजन थाळी योजना गरीब, गरजू आणि निराश्रित लोकांसाठी नक्कीच वरदान म्हणून सिद्ध होईल असा विश्वास जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला.
तसेच कोरोना काळात कोणीही राजकारण करू नये. आम्ही नुसत्या थाळ्या वाजवत नाही तर गरजूंना थाळ्या खाऊ घालतो असा टोलाही कल्याण जिल्हाप्रमुख प्रमुख गोपाळ लांडगे यांनी यावेळी भाजपला लगावला.
यावेळी डोंबिवली विधानसभा संघटक तात्यासाहेब माने, राजेश कदम, महिला संघटक कविता गावंड, संतोष चव्हाण, माजी परिवहन सभापती सुधीर पाटिल, सतीश मोडक,राम मिराशी, दीपक भोसले, सागर जेधे आदी उपस्थित होते.
दरम्यान या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी त्याचा लाभ घेण्यासाठी गरजू व्यक्तींनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा