Home ठळक बातम्या ज्येष्ठ नागरिकांकडून कुटुंबाची नाही तर देशाची भावी पिढी घडवण्याचे काम – सुरेश...

ज्येष्ठ नागरिकांकडून कुटुंबाची नाही तर देशाची भावी पिढी घडवण्याचे काम – सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे

कल्याणात ज्येष्ठ नागरिकांची घेतली भेट

कल्याण दि.21 एप्रिल :
आपल्याकडील ज्येष्ठ नागरिकांकडून केवळ त्यांच्या कुटुंबाची नाही तर देशाची भावी पिढी घडवण्याचे काम केले जात असल्याची भावना भिवंडी लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी व्यक्त केली. कल्याण पश्चिमेच्या चिकणघर येथील माऊली ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात झालेल्या संवाद सोहळ्यात ते बोलत होते.

महाराष्ट्रामध्ये कल्याण शहराची एक वेगळी अशी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख आहे. ही संस्कृती आणि सांस्कृतिक ओळख टिकवून ठेवण्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचाही महत्त्वाचा वाटा असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. नोकरीमधून निवृत्त झाल्यावर ज्येष्ठ नागरिकांची आयुष्यातील दुसरी महत्त्वाची इनिंग सुरू होते. ज्येष्ठ नागरिकांकडे असलेल्या प्रचंड अनुभवाच्या शिदोरीवर समाजाला मार्गदर्शनाच्या माध्यमातून दिशा दाखवण्याचे काम होऊ शकते असा विश्वासही सुरेश म्हात्रे यांनी व्यक्त केला.

दरम्यान यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हात्रे यांच्याकडे काही मागण्या केल्या. ज्यामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना लागू करावी, आरोग्य योजनेसाठी तरतूद करावी, विरंगुळा केंद्र स्थापन करावे, ज्येष्ठ नागरिक भवन उभारावे आदी प्रमूख मागण्या केल्या. ज्यावर सुरेश म्हात्रे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपण खासदार झाल्यास या सर्व मागण्या नक्कीच पूर्ण करू असे आश्वासन यावेळी दिले.
यावेळी केडीएमसीचे माजी नगरसेवक संजय पाटील, ज्येष्ठ नागरिक संघ आणि समनव्य समितीचे पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा