Home ठळक बातम्या जागतिक पुस्तक दिनानिमित्त डोंबिवलीच्या फडके रोडवर साकारला अनोखा “बुक स्ट्रीट”

जागतिक पुस्तक दिनानिमित्त डोंबिवलीच्या फडके रोडवर साकारला अनोखा “बुक स्ट्रीट”

डोंबिवली दि.21 एप्रिल :
जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीच्या फडके रोडवर बुक स्ट्रीट या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्याच्या हेतूने डोंबिवलीतील ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’च्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही या बुक स्ट्रीटला भेट देऊन या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. (On the occasion of World Book Day, a unique “Book Street” was created on Phadke Road, Dombivali.)

गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या आणि भारतातील या एकमेव उपक्रमामध्ये वाचनप्रेमींसाठी विनामूल्य पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. सकाळी ५ वाजता या बुक स्ट्रीटचे उद्घाटन करण्यात आले आणि सकाळी १० वाजेपर्यंत हा बुक स्ट्रीट रसिक वाचकांसाठी खुला होता. विविध भाषेची सुमारे १ लाख पुस्तके यामध्ये मांडण्यात आली होती. ज्यामध्ये तब्बल ८ हजार वाचनप्रेमी वाचकांनी बुक स्ट्रीटला भेट देत मोफत पुस्तके प्राप्त करून घेतली.

यावेळी बुक स्ट्रीटमध्ये अनेक पुस्तकांपासून साकारण्यात आलेली ‘आय लव्ह बुक्स’ ही प्रतिकृती वाचकांची खास आकर्षण ठरली. हा बुक स्ट्रीट उपक्रम यशस्वी होण्यास कल्याण डोंबिवली महानगरपलिका, डोंबिवली शहर वाहतूक विभाग आणि डोंबिवली शहर पोलिस विभाग यांचे विशेष सहकार्य लाभले.

दरम्यान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही या उपक्रमाला आवर्जून भेट दिली आणि आपल्या आवडीची काही पुस्तकेही घेतल्याचे दिसून आले. यावेळी पै फ्रेंड्स लायब्ररीचे पुंडलिक पै, भूषण पत्की, दर्शना सामंत, वृंदा भुस्कुटे, ललिता छेडा, श्रीकांत पावगी, रसिका कुसुरकर शेकडो पुस्तक प्रेमी आणि डोंबिवलीकर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा