डोंबिवली दि.12 एप्रिल :
कल्याण डोंबिवली ग्रामीण विभागात कावळ्यांच गांव म्हणून ओळखले जाणारे उंबार्लि गावाकडे आता विकसित गाव म्हणून पाहिले जाईल अशी माहिती शिवसेना कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमूख सुखदेव पाटील यांनी दिली. गावात होत असलेली विकास कामे जोर धरत असून त्याचा फायदा उंबार्लि तसेच पंचक्रोशीतील गावांना होत आहे. येथील ग्रामस्थांना आता भविष्यात पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही अशी पुष्टीही पाटील यांनी जोडली.
महापालिकेत समाविष्ट असलेल्या त्या 27 गावातील गावकऱ्यांना पाण्याचा प्रश्न त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे एमआयडीसी कार्यालयावर नेहमीच ग्रामीण भागातील जनता धडक मोर्चा काढून आपल्या व्यथा मांडत असतात. ग्रामपंचायत अंतर्गत त्या काळी टाकण्यात आलेल्या पाईपलाईन्स आता कुचकामी ठरत असल्याने पाण्याच्या समस्या जोर धरत आहेत. शहराजवळ असणाऱ्या या गावत वस्ती वाढत असल्याने आधीच कमी प्रमाणात असलेल्या पाण्याची समस्या तीव्र होत आहे. मात्र हा प्रश्न उंबर्लि गावाला भेडसावत नाही कारण हे गाव इतर गावांच्या प्रमाणात डोंबिवली शहरापासून थोडे दूर आहे. तरीही निसर्गाच देणं या गावाला मिळाल्याने आता अनेकजण सेकंड होम म्हणून उंबार्लि गावाकडे जात आहेत.
याबाबत विकसित उंबार्लि गावाची सविस्तर माहिती देताना कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमूख सुखदेव पाटील म्हणाले की केंद्र सरकारच्या अमृत जल योजना अंतर्गत उंबार्लि गावात पाईपलाईन टाकण्याचे काम 90 टक्के पूर्ण झाके आहे. दरम्यान त्यासाठी आवश्यक असणाऱ्या टाकीचे कामही प्रगतीपथावर आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने येत्या 25 वर्षांसाठी पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. गावात एमएमआरडीए माध्यमातून 12 करोड 45 लाख रुपये रस्त्यासाठी मंजूर झाले आहेत. टेंडर प्रक्रिया होऊन आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. तसेच माजी आमदार सुभाध भोईर यांच्या माध्यमातून 10 लाख रुपये खर्च करून तरुणांसाठी व्यायामशाळा बांधण्यात आली आहे. मराठी शाळेजळ जो मुख्य रस्ता आहे त्याचेही काम सुरू आहे. त्यामुळे आता पूर्वीसारखं उंबार्लि खेडेगांव म्हणून न रहाता आता उंबार्लिची विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे.
आता या गावात मोठ्या टोलेजंग इमारतींचं काम सुरू आहे. त्यामुळे उद्योजकही या पट्ट्यात यायला लागले असून गावाचा विकास होऊन रोजगाराच्या नव्या वाटा सुरू होत आहेत. गावातील समस्या सोडवण्यासाठी गावतील प्रतिष्ठित मंडळींनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला आणि डॉ. शिंदे यांच्या प्रयत्नामुळे उंबार्लि गावात विकासाची गंगा नक्कीच येईल असेही सुखदेव पाटील यांनी सांगितले.