Home ठळक बातम्या ते सर्वच बाबतीत अपयशी, दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेण्यापलिकडे काही येत नाही –...

ते सर्वच बाबतीत अपयशी, दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेण्यापलिकडे काही येत नाही – बाळ्यामामा म्हात्रे यांची कपिल पाटील यांच्यावर टिका

कल्याणात उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे मेळावा संपन्न

कल्याण दि.4 मे :
कपिल पाटील हे सर्वच बाबतीत अपयशी खासदार असून दुसऱ्यांनी केलेल्या विकासकामांचे श्रेय घेण्यापालिकडे त्यांना काही येत नसल्याची खरमरीत टिका महविकास आघाडीचे उमेदवार सुरेश(बाळ्या मामा) म्हात्रे यांनी कल्याणात केली आहे. कल्याण पश्चिमेत काल झालेल्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. ज्यामध्ये बाळ्या मामा यांनी कपिल पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. (They fail in all respects, there is nothing beyond taking credit for other people’s work – Balyamama Mhatre’s criticism of Kapil Patil)

आपल्याकडे विकासाची ब्ल्यू प्रिंट…
भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी आपण एक विकासाची ब्ल्यू प्रिंट बनवली असून त्यामध्ये आरोग्य, शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा अशा सर्व प्रश्नांवरील उत्तरे आपण त्यात दिली आहेत. आणि विकासाची ही ब्ल्यू प्रिंट घेऊन आपण मतदरसंघांतील लोकांसमोर जात असल्याची माहिती बाळ्या मामा यांनी यावेळी दिली.

खासदारकी,मंत्रीपद उपभोगूनही कोणतेही काम नाही…
10 वर्षे खासदारकी आणि 3 वर्षे मंत्रीपद उपभोगूनही कपिल पाटील यांनी कोणतेही काम केले नाही. मग ते रेल्वेचे असो, नॅशनल हायवेचे असो, आरोग्याचे असो की शिक्षण- रोजगाराचे. या एकाही क्षेत्रामध्ये त्यांनी कोणतेही ठोस काम केलेले नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.

तुम्हाला खासदारकी, त्याचे अधिकार कळले का?…
तर कपिल पाटील यांनी 34 हजरांची कामे कुठे केली हे दाखवावे. सरपंच, नगरसेवक जिल्हा परिषद सदस्यांनी काम केले तरी मीच केले सांगतात, तुम्हाला खासदारकी कळली का? खासदाराचे अधिकार समजले का? एक तरी असा प्रकल्प दाखवा , ज्यातून रोजगार निर्माण झालेत. दहा वर्षांत फंड कुठे खर्च केला? असे प्रश्न उपस्थित करत बाळ्या मामा यांनी कपिल पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

10 वर्षात संसदपटूचा एकदाही मान का नाही ?…
तर त्यांनी 10 वर्षांत एक तरी बिल पास केलं का. तुम्ही एवढे हुशार आहात, प्रशासनावर एवढे वर्चस्व आहे तर 10 वर्षात संसदपटूचा एकदाही मान का मिळाला नाही असे सांगत ते सर्वच बाबतीत अपयशी खासदार असून दुसऱ्याने केलेलं कामाचे श्रेय घेण्यापलिकडे कपिल पाटील यांना काहीही येत नसल्याची खरमरीत टिका सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांनी यावेळी केली.

या मेळाव्याला शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी, अल्ताफ शेख, शहरप्रमुख सचिन बासरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा