Home ठळक बातम्या आगामी केडीएमसी सार्वत्रिक निवडणुकीचे असे आहे प्रभागनिहाय आरक्षण

आगामी केडीएमसी सार्वत्रिक निवडणुकीचे असे आहे प्रभागनिहाय आरक्षण

 

कल्याण डोंबिवली दि.29 जुलै :
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. यापूर्वी जाहीर करण्यात आलेले महिलांचे आरक्षण रद्द करून आज ते पुन्हा नव्याने जाहीर करण्यात आले. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या अध्यक्षतेखाली कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिरात ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. (This is the ward wise reservation for the upcoming KDMC general election)

कल्याण डोंबिवली महापालिकेची यंदाची निवडणूक प्रथमच पॅनल पद्धतीने होत आहे. यासाठी एकूण 44 प्रभागात 133 लोकप्रतनिधी निवडून येणार असून त्यामध्ये 50 टक्के म्हणजे 67 महिला लोक प्रतिनिधी असणार आहेत. त्यातही अनुसूचित जाती प्रवर्गामधून 13 (पैकी 7 महिला), अनुसूचित जमाती 4 (पैकी 2 महिला ) नागरिकांचा मागास प्रवर्गमधून 35 (पैकी 18 महिला) तर उर्वरित म्हणजेच सर्वसाधारण प्रवर्गातून 81 (पैकी 40 महिला) लोक प्रतिनिधी निवडून येणार आहेत.

असे आहे आगामी केडीएमसी निवडणुकीचे संपूर्ण आरक्षण

 

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा