Home ठळक बातम्या दुर्दैवी घटना : कल्याणात सहाव्या मजल्यावरून लिफ्टच्या डक्टमध्ये पडल्याने मुलाचा मृत्यू

दुर्दैवी घटना : कल्याणात सहाव्या मजल्यावरून लिफ्टच्या डक्टमध्ये पडल्याने मुलाचा मृत्यू

 

कल्याण दि.४ मे :
लिफ्ट पकडण्याच्या घाईत चौदा वर्षांच्या मुलाचा डक्टमध्ये पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कल्याणात बुधवारी रात्री घडली. हिमांशू कनोजिया असे या मुलाचे नाव आहे. (Tragedy: Boy dies after falling into lift duct from 6th floor in Kalyan)

कल्याण पश्चिमेच्या गांधारी परिसरात कनोजिया कुटुंबाचा लॉन्ड्रीचे दुकान आहे. काल रात्री हिमांशू हा इस्त्रीचे कपडे देण्यासाठी शेजारील इमारतीत गेला होता. त्यावेळी आधी चौथ्या मजल्यावरील व्यक्तीला कपडे देऊन त्याने सहाव्या मजल्यावरील घरामध्येही कपडे दिले आणि तो परत खाली यायला निघाला.

त्यावेळी खाली उतरत असताना ५ मजल्यावरून त्याने लिफ्टमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात खाली लिफ्टच्या डक्टमध्ये पडून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा