Home ठळक बातम्या महामुंबईतला प्रवास नव्या वर्षात अधिक सुखकर; कल्याण लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी वाहतूक प्रकल्प...

महामुंबईतला प्रवास नव्या वर्षात अधिक सुखकर; कल्याण लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी वाहतूक प्रकल्प अंतिम टप्प्यात

शिळफाटा उड्डाणपुलाच्या तीन मार्गिका १५ जानेवारीपासून सेवेत तर शिळफाटा महापे पाईपलाईन रस्त्याच्या मार्गिकेचे रूंदीकरण होणार

कल्याण दि.4 डिसेंबर :
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (Mp Dr Shrikant shinde) यांच्या पुढाकारातून मतदारसंघातील  वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध विकासकामे सुरू आहेत. या विकासकामांची खासदार डॉ. शिंदे यांनी सोमवारी पाहणी केली. यावेळी सर्व प्रकल्प गतीने पूर्ण करण्याच्या सूचना खासदार शिंदेंनी अधिकाऱ्यांना दिल्या.  यामुळे नवी मुंबई आणि कल्याण येथील नागरिकांचा नवीन वर्षातील प्रवास अधिक सुखकर होणार असून वाहतुकीचे सर्व अडथळे दूर होणार आहेत. तर या नवीन प्रकल्पांमुळे कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या शहरातील वाहतूक कोंडी सुटणार असून नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. तर ऐरोली आणि काटई येथील बोगद्याच्या पुर्णत्वानंतर नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली येथील ४५ मिनिटांचे अवघ्या ५ ते १० मिनिटांवर येणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.(Travel to Greater Mumbai more pleasant in the new year; Ambitious transport project in Kalyan Lok Sabha constituency in final phase)

जानेवारी – फेब्रुवारीपर्यंत महत्त्वपूर्ण पुलांच्या मार्गिका होणार खुल्या…
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्प गतीने करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी शिळफाटा उड्डाणपुलाचे प्रगतीपथावर असलेले काम लवकरच बहुतांशी पूर्ण होणार असून त्यामुळे १५ जानेवारीपर्यंत यातील तीन मार्गिका प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत. तर येथील ऐरोली काटई उन्नत मार्गाची डाव्या बाजूची मार्गिका फेब्रुवारी अखेरीस सेवेत येणार आहे. या दोन पर्यायांमुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. तर शिळफाटा महापे या पाईपलाईन रस्त्यावर उपलब्ध जागेत रस्त्याचे रूंदीकरण केले जाणार असून येथेही कोंडीमुक्त प्रवास करता येणार आहे. ज्यावेळी येथील उड्डाणपुलाचे काम सुरू होईल, तेव्हाही कोंडीमुक्त प्रवास करता येणार आहे, असेही यावेळी खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले.

खा.डॉ. श्रीकांत शिंदेंकडून महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामाचा आढावा…
कल्याण लोकसभा मतदारसंघात वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणारे अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. गेल्या काही वर्षात शिळफाटा कल्याण रस्ता सहा पदरी केल्याने येथील वाहतुकीला खऱ्या अर्थाने वेग आला आहे. सोबतच या भागातील वाहतूक अधिक वेगवान व्हावी, यासाठी येथे मुंब्रा वाय जंक्शन पुल उभारण्यात आला. येथेच ऐरोली – काटई उन्नत मार्ग, शिळफाटा उड्डाणपूल उभारला जात आहे. शेजारी महापे रस्त्यावर जाण्यासाठी असलेल्या पाईपलाईन रस्त्यावर उड्डाणपूल उभारून कोंडीमुक्त वाहतूक केली जाणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात येथील वाहतूक वेगवान होईल. सोमवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्पांची पाहणी केली. सोमवारी सकाळी रांजणोली नाक्यापासून या दौऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर पलावा जंक्शन येथे प्रगतीपथावर असलेल्या उड्डाणपुलाची त्यांनी पाहणी केली.

शिळफाटा ते महापे पाईपलाईन रस्त्याचे होणार रुंदीकरण…
हे काम तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केल्या. वाहतूक विभागाने प्रायोगिक तत्वावर केलेल्या शिळफाटा ते महापे रस्ता पाईपलाईन रस्त्याच्या वाहतूक नियोजनामुळे येथे काही तास कोंडी होत होती. या भागाचीही खासदार डॉ. शिंदे यांनी अचानक पाहणी केली. या रस्त्यावरून गर्दीच्या वेळी होणारी वाहतूक मोठी आहे. त्यामुळे या रस्त्यावरची एक मार्गिका बंद केल्याने झालेल्या कोंडीचा त्यांनी आढावा घेतला. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना एमआयडीसीच्या दोन जलवाहिन्या जातात. या जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू आहे. तसेच लवकरच येथे उड्डाणपुलाचे काम सुरू होणार आहे. हे काम सुरू करण्यासाठी रस्त्याचा काही भाग व्यापला जाणार आहे. अशावेळी येथून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काय करता येईल, याची पाहणीही यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध असून त्या जागेवर डांबरीकरण केल्यास अतिरिक्त रस्ता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येथे कोंडीशिवाय प्रवास करता येणार आहे. या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम तातडीने हाती घेण्याच्या सूचना यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

नवी मुंबईहून काटई केवळ पाच ते दहा मिनिटांत पोहोचता येणार…
यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिळफाटा ते कल्याण फाटा उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. सध्या याचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे. त्यामुळे या पुलाच्या तीन मार्गिका येत्या १५ जानेवारीला खुल्या होतील, अशी माहिती यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. त्यामुळे कल्याण फाटा ते शिळफाटा रस्त्यावर होणारी जवळपास सर्वच वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. विनाथांबा प्रवास लवकरच शक्य होणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले आहे. याचवेळी त्यांनी ऐरोली काटई उन्नत मार्गाच्या बोगद्याच्या कामाचा आढावा घेतला. डाव्या बोगद्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून येथील विद्युतीकरणाचे काम पूर्ण तातडीने पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे बोगद्याची डावी बाजू फेब्रुवारी अखेरपर्यंत वाहतुकीस खुली करण्यात येणार असल्याचीही माहिती डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. ही मार्गिका खुली झाल्यास मुंब्रा येथून थेट ठाणे – बेलापूर रस्त्यावर जाता येणार आहे. त्यामुळे प्रवासाचा मोठा वेळ वाचणार आहे. या बोगद्याच्या पुर्णत्वानंतर नवी मुंबई ते काटई येथील ४५ मिनिटांचे अंतर केवळ पाच ते दहा मिनिटांवर येणार आहे. या ऐरोली काटई उन्नत मार्गाची एकूण लांबी १२.३ किलोमीटर इतकी आहे. यातील पहिला टप्पा – ठाणे बेलापूर ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ हा एकूण ३.४३ किलोमिटर लांबीचा आहे. तर या मार्गातील बोगदा १.६८ किलोमीटरचा आहे. त्यामुळे येत्या काळात येथील वाहतुक वेगवान होणार आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा