Home कोरोना कल्याण ग्रामीणमधील उध्दव ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखांसह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला विधानसभा...

कल्याण ग्रामीणमधील उध्दव ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखांसह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला विधानसभा संघटकांचा शिवसेनेत प्रवेश

आगरी समाजातील ज्येष्ठ नेते गुलाब वझे यांचाही शिवसेनेत प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला प्रवेश

ठाणे दि.9 मे :
कल्याण लोकसभेतील कल्याण ग्रामीण भागात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला पुन्हा एकदा झटका बसला आहे. कल्याण ग्रामीणमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, राष्ट्रवादी पवार गटाच्या विधानसभा संघटक निला पाटील यांच्यासह आगरी समाजातील ज्येष्ठ समाजसेवक, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, २७ गाव संघर्ष समितीचे दत्ता वझे या सर्वांनी अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत
हा प्रवेश पार पडला. (Loksabha elections) (Uddhav Thackeray group’s vice-district head from Kalyan rural along with women assembly organizers of nationalist Sharad Pawar group join Shiv Sena)

यापूर्वीच डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर, महिला जिल्हा संघटक कविता गावंड, उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील हे गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. मागील १० वर्षात कल्याण लोकसभेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकासकामांनी प्रभावित होऊन त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासह विभाग संघटक मधुकर शेळके, सुषमा ढोले, कैलास पाटील, उपविभाग प्रमुख प्रदीप चुडनाईक, शाखाप्रमुख गिरीश काळण यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विधानसभा संघटक निला पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत मधुरा खेडकर, सरिता वाघेरे आणि मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या आज शिवसेनेत सामील झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.

कल्याण ग्रामीण भागातील आगरी समाजातले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गुलाब वझे, २७ गाव संघर्ष समितीचे नेते आणि माजी सरपंच दत्ता वझे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. वझे यांचे आगरी समाजात उत्तम संघटन असून आगरी युथ फोरमच्या माध्यमातून आगरी महोत्सवासह विविध उपक्रम, आंदोलने, कार्यक्रम ते राबवत असतात. त्यांच्यासह माजी सरपंच अभिमन्यू म्हात्रे, बाळाराम ठाकूर, वर्गीस म्हात्रे, ज्ञानेश्वर माळी, महेश म्हात्रे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. वझे यांच्या प्रवेशामुळे ग्रामीण भागात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मागील १० वर्षात कल्याण लोकसभेत मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून त्यांच्यावर विश्वास ठेवून आज मोठ्या ताकदीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली असून श्रीकांत शिंदे हे विक्रमी मताधिक्याने विजयी होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. तर शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आज या सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांच्या प्रवेशामुळे निश्चितपणे कल्याण लोकसभेत शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

—–

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा