Home ठळक बातम्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अशक्य कामेही शक्य...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अशक्य कामेही शक्य – आमदार निरंजन डावखरे

विरोधकांची कितीही इच्छा नसली तरी राज्याचा अर्थसंकल्प प्रत्यक्षात उतरवणारच

कल्याण दि.11 मार्च :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक भागाचा चौफेर दृष्टीकोनातून विकास होतोय. अनेक अशक्यप्राय वाटणारी कामे या दोघांनी शक्य करून दाखवली आहेत. त्यामूळे विरोधकांची कितीही इच्छा असली तरी अर्थसंकल्पातील घोषणा हे सरकार 100 टक्के प्रत्यक्षात उतरवून दाखवेल असा विश्वास भाजपचे प्रदेश प्रवक्ते आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला आहे. नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत डावखरे यांनी आज कल्याणात पत्रकारांशी संवाद साधत अर्थसंकल्पावर टिका करणाऱ्या विरोधी पक्षावर निशाणा साधला. (Under the leadership of Chief Minister Eknath Shinde – Deputy Chief Minister Devendra Fadnavis, impossible tasks are possible – MLA Niranjan Dawkhare)

अध्यात्म आणि विकासाचा सुवर्णसंगम साधणारा पंचामृत अर्थसंकल्प…

स्वातंत्र्याच्या अमृतकाळात महाराष्ट्राच्या विकासाचे `पंचामृत’ सूत्र घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आनंद देणारा आहे. भाजपा-शिवसेना युतीचे सरकार समाजाप्रती संवेदनशील सरकार असल्याचे प्रतित झाले असून अध्यात्म आणि विकासाचा सुवर्णसंगम साधणारा हा पंचामृत अर्थसंकल्प आहे. असल्याचे प्रतिपादनही आमदार निरंजन डावखरे यांनी यावेळी केले.

राज्याच्या इतिहासात जनभागीदारीतून सादर झालेला पहिला अर्थसंकल्प…
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जनभागीदारीतून अर्थसंकल्प सादर झाला आहे. ४० हजार नागरिकांच्या सुचनांच्या सहाय्याने तयार केलेला हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने लोकांना हवा असलेला अर्थसंकल्प ठरला आहे. शेतकरी, महिला, नोकरदार, विद्यार्थी, अल्प मानधनात काम करणारे शिक्षण सेवक, अंगणवाडी सेविका- मदतनीस, छोटे व्यापारी, ओबीसी, आदिवासी, दलित बांधव, मच्छिमार, निराधार नागरिक, दिव्यांग आदी घटकांचा या अर्थसंकल्पात विचार करत दिलासादायक तरतूद केल्याचेही डावखरे यांनी सांगितले.

अर्थसंकल्पात लोकांचे जीवनमान उंचावणाऱ्या योजना…

तर शेतकऱ्यांना १२ हजार रुपये सन्मान निधी, एसटीत महिलांना ५० टक्के प्रवास, अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मानधन, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ झाली आहे. कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू फळ विकास योजना क्रांती घडविणारी आहे. कोकणात सिंचन सुविधांसाठी विशेष कृती कार्यक्रम, खारभूमी बंधाऱ्यांच्या कामांना गती मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मदत होईल. लेक लाडकी योजनेतून मुलीला १८ वर्ष झाल्यावर ७५ हजार रुपये, महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण, इतर मागासवर्गीयांसाठी १० लाख घरांची मोदी आवास घरकुल योजना, आपला दवाखाना आदी योजना जीवनमान बदलणाऱ्या असल्याचेही निरंजन डावखरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, महिला मोर्चा अध्यक्ष रेखा चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष नाना सूर्यवंशी, कल्याण पश्चिमचे अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, माजी नगरसेवक अर्जुन भोईर, वरुण पाटील, वैशाली पाटील , आशिष पावस्कर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा