Home ठळक बातम्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर – खासदार डॉ. श्रीकांत...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

 

गणपतीसाठी गावाला जाणाऱ्या ३५० मोफत बसेसना खा. शिंदेंनी दाखवला झेंडा

कल्याण डोंबिवली दि.२९ ऑगस्ट :
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्वी रिक्षाचालक होते. त्यांना रिक्षा चालवण्याचा अनुभव होता म्हणूनच आज त्यांच्या हाती महाराष्ट्राचे स्टेअरिंग असून त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य विकासाच्या वाटेवर असल्याचे उद्गार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीमध्ये काढले. गणेशोत्सवानिमित्त कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या भक्तांसाठी खासदार डॉ. शिंदे यांच्यामार्फत काल कल्याण डोंबिवली परिसरातून तब्बल ३५० एसटी बसेस सोडण्यात आल्या.

सारथी योग्य असला की, प्रवासही योग्य दिशेने होतो असे म्हणत काहींचे सारथी चुकीचे निघाल्याने ते भरकटले. सध्या सर्व काही सुरळीत होत आहे. महाविकास आघाडी काळात केवळ हिंदूच्या सणावर निर्बंध लादले गेल्याचे सांगत आता एकामागून एक सण येत असून बिनधास्तपणे हे सण उत्सव साजरे करण्याचे आवाहनही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी केले.

गणपतीसाठी तब्बल ३५० मोफत एस टी बसेस…
कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली आणि दिवा येथिल विविध ठिकाणांहून गणेशोत्सवासाठी कोकण, सांगली, सातारा, आणि कोल्हापूर येथे जाणाऱ्या गणेशभक्त चाकरमान्यांकरिता आयोजित मोफत बस सेवेला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी झेंडा दाखवला. त्यासोबतच या सर्व बसेसचे सारथ्य करणाऱ्या वाहक आणि चालकांचा याप्रसंगी सत्कारही करण्यात आला. यावेळी आपापल्या गावी जाण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे दोन वर्षानंतर प्रथमच गणपतीला गावी जायला मिळणार असल्याने गणेश भक्तांच्या चेहऱ्यांवर प्रचंड आनंद दिसत होता.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा