Home ठळक बातम्या कल्याणमधील सिग्नल डान्सरचा अनोखा व्हिडियो व्हायरल

कल्याणमधील सिग्नल डान्सरचा अनोखा व्हिडियो व्हायरल

 

कल्याण दि.27 जून :
गेल्या अनेक वर्षांपासून बंद असणारी कल्याण डोंबिवलीतील सिग्नल यंत्रणा हळूहळू सुरू होऊ लागली आहे. विशेषतः कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी ते बिर्ला कॉलेज हा सर्वात रहदारीचा मार्ग सिग्नल यंत्रणेमूळे वाहतूक कोंडी मुक्त झाला आहे. त्यापैकीच एक महत्वाचा असणारा खडकपाडा सर्कलवरील सिग्नल सध्या मात्र वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. याठिकाणी लाल सिग्नल लागल्याने थांबलेल्या गाड्यांच्या गर्दीत एक जण चक्क ब्रेक डान्स करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हा ब्रेक डान्स करणारा व्यक्ती नेमका कोण आहे? याची अद्याप तरी ओळख पटली नसली तरी सिग्नल लागल्यापासून ते सुटेपर्यंत काही सेकंदाच्या काळात त्याने असा काही भन्नाट डान्स करतो की बस्स. या सिग्नल डान्सरचा हा ब्रेक डान्स आणि त्याचा ठेका सध्या कल्याण डोंबिवलीत चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. बहुधा सिग्नल लावल्याचा आनंदच हा आपल्या डान्समधून व्यक्त करतोय की काय असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा