Home कोरोना कल्याण डोंबिवलीत पुढील 2 दिवस शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण

कल्याण डोंबिवलीत पुढील 2 दिवस शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण

 

इतर नागरिकांचे लसीकरण उद्या बंद राहणार

कल्याण डोंबिवली दि.1 जून :
कल्याण डोंबिवलीमध्ये उद्यापासून पुढील 2 दिवस शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचेच लसीकरण होणार असल्याची माहिती केडीएमसी प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या इतर नागरिकांचे लसीकरण केले जाणार नाही.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश निश्चित झालेल्या 18 ते 44 वयोगटातील विद्यार्थ्यांना कोविशिल्डची लस दिली जाणार आहे. उद्या बुधवारी 2 जून आणि गुरुवारी 3 जून असे दोन दिवस आर्ट गॅलरी, लालचौकी कोविड लसीकरण केंद्र कल्याण (प.) येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे लसीकरण सुरू राहणार आहे.

या लसीकरणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढील कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे…

1) शासकीय ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/वोटर आयडी/पासपोर्ट यापैकी एक)

2) कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रहिवासी असल्याचा पुरावा (ॲड्रेस प्रुफ)

3) 20 फॉर्म अथवा DS 160 फॉर्म किंवा प्रवेश निश्चित झाल्याचे परदेशी विद्यापीठाचे/ शिक्षण संस्थेचे पत्र. या दोन्हीपैकी एक

या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणि मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी लसीकरण केंद्रावर आणण्याच्या सूचना केडीएमसीकडून देण्यात आल्या आहेत. लसीकरण क्रेंदावर झेरॉक्स प्रती जमा करुन घेतल्या जाणार आहेत. परदेशी शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झालेल्या पात्र विद्यार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन केडीएमसीतर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान महापालिकेला लस उपलब्ध न झाल्यामुळे इतर सर्व नागरिकांचे आणि इतर सर्व केंद्रांवर उद्या लसीकरण बंद राहणार असल्याची माहितीही केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा