Home ठळक बातम्या भारतीय जनता पक्षाच्या कल्याण पश्चिम शहराध्यक्षपदी वरुण पाटील

भारतीय जनता पक्षाच्या कल्याण पश्चिम शहराध्यक्षपदी वरुण पाटील

कल्याण दि.23 ऑगस्ट :
भाजपच्या कल्याण पश्चिम शहराध्यक्षपदी माजी गटनेते वरुण सदाशिव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी यांनी कल्याण पश्चिम अध्यक्षपदी वरुण सदाशिव पाटील यांच्यासह संपूर्ण कल्याण जिल्ह्याच्या मंडल अध्यक्षांची यादी नुकतीच जाहीर केली आहे.
कल्याणातील भाजपाचे तरुण नेते म्हणून वरुण पाटील यांनी अल्पावधीतच स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवक आणि भाजपाचे गटनेतेपद भूषविले आहे. या दोन्ही पदांच्या कार्यकाळात त्यांनी कल्याण शहराच्या विकासासाठी अनेक प्रकल्प राबविण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माझ्यावर विश्वास दाखवून पक्षाची मोठी जबाबदारी दिली आहे. आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजना प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोचविण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. त्याचबरोबर भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात संघटना मजबूत केली जाईल, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी आपल्या निवडीबद्दल व्यक्त केली.
कल्याण जिल्ह्यातील नवनियुक्त मंडल अध्यक्ष…
1) कल्याण पश्चिम – वरुण पाटील
2) कल्याण पूर्व – संजय मोरे
3) मोहना – टिटवाळा – शक्तिवान भोईर
4) डोंबिवली ग्रामीण – सूर्यकांत माळकर
5) डोंबिवली पूर्व – मुकुंद पेडणेकर
6) डोंबिवली पश्चिम – समीर चिटणीस
7) अंबरनाथ पूर्व – सर्जेराव माहूरकर

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा