Home ठळक बातम्या डोंबिवली पूर्वेचा पाणीपुरवठा शुक्रवारी (12 जानेवारी 2024) राहणार बंद

डोंबिवली पूर्वेचा पाणीपुरवठा शुक्रवारी (12 जानेवारी 2024) राहणार बंद

डोंबिवली दि.11 जानेवारी :
डोंबिवली शहरातील पूर्व भागाचा पाणीपुरवठा उद्या म्हणजेच शुक्रवारी 12 जानेवारी 2024 रोजी बंद राहणार आहे. (Water supply to Dombivli East will remain closed on Friday (January 12, 2024).)
डोंबिवली पूर्वेत कल्याण रस्त्यावरील शेलार चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ९०० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी आहे. या जल वाहिनीतून होत असणाऱ्या पाणीगळतीची तातडीने दुरूस्ती करण्यासाठी हा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीच्या डोंबिवली विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांनी दिली आहे.

हे दुरुस्तीचेनकाम करण्याकरीता शुक्रवारी १२ जानेवारी सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत डोंबिवली पूर्व विभागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच या परिसराला शट डाऊनच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा ठेऊन महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केडीएमसी तर्फे करण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा