Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी (28 नोव्हेंबर 2023) राहणार बंद

कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी (28 नोव्हेंबर 2023) राहणार बंद

कल्याण डोंबिवली दि.24 नोव्हेंबर :

कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी 28 नोव्हेंबर 2023 रोजी बंद राहणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, नेतिवली आणि मोहिली जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत तसेच यांत्रिकी उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामूळे मंगळवारी कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती केडीएमसी यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता राजू राठोड यांनी दिली आहे.(Water supply to Kalyan Dombivli will be shut next Tuesday (November 28, 2023)

कल्याण पूर्व – पश्चिम, डोंबिवली पूर्व -पश्चिम आणि कल्याण ग्रामीण विभाग (टिटवाळा, वडवली, आंबिवली , शहाड, अटाळी) या भागांचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता राजू राठोड यांनी केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा