Home ठळक बातम्या कल्याण-शीळ काँक्रीट रस्त्याचे काम संथगतीने – आमदार राजू पाटील

कल्याण-शीळ काँक्रीट रस्त्याचे काम संथगतीने – आमदार राजू पाटील

डोंबिवली दि.18 मार्च :

शिळफाटा ते भिवंडी बायपास रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याची टिका आमदार राजू पाटील यांनी केली आहे. आमदार पाटील यांनी आज एमएसआरडीसी अधिकारी आणि केडीएमसी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही टिका केली. (Work on Kalyan-Sheel concrete road at a slow pace – MLA Raju Patil)

या रस्त्याचे काम पूर्ण करण्याबाबत आम्हाला वेळोवेळी अनेक तारखा देण्यात आल्या. मात्र ज्या वेगाने काम होणे अपेक्षित आहे त्या वेगाने काम होताना दिसत नसल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. तसेच काही ठिकाणी कामामध्ये सातत्य दिसत नसून काही ठिकाणी कामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित करत या रस्त्याने शहरात जाणाऱ्या जोडरस्त्यांचीदेखील पाहणी आमदार राजू पाटील यांनी पाहणी केली. तर येत्या एक दिड महिन्यात या रस्त्यावरील वाहतुकीचा बराचसा ताण हलका होईल असेही आमदार राजू पाटील यावेळी म्हणाले.

यावेळी एमएसआरडीसीचे अधिकारी, केडीएमसीचे अधिकारी, ट्रॅफिक पोलीस, मनसे जिल्हासंघटक हर्षद पाटील, शहराध्यक्ष मनोज घरत, संतोष पाटील, योगेश पाटील आदी पदाधिकारीही उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा