Home कोरोना प्रलंबित मागण्यांसाठी वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम

प्रलंबित मागण्यांसाठी वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम

 

कल्याण दि.11 मे :
विविध मागण्यांसाठी वारंवार दाद मागूनही शासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ राज्यातील वीज कंत्राटी कर्मचारी आज काळ्या फिती लावून काम करत आहेत. कल्याण,डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आदी उपविभागीय कार्यालयांसह संपूर्ण राज्यभरात कंत्राटी कर्मचारी काळ्या फिती लावून काम करत असल्याची माहिती कंत्राटी कामगार संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज मनुचारी यांनी दिली.

महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या 3 ही वीज कंपन्यांत सुमारे 32 हजार कंत्राटी कामगार नियमित रिक्त पदांच्या जागेवर काम करत आहेत. कोरोना काळात या कामगारांनी आपला जीव धोक्यात घालून अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा दिला. हे काम करत असताना 40 कंत्राटी कामगारांच्या झालेल्या मृत्यूकडे शासनाने सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याचे मनुचारी यांनी सांगितले. राज्यात झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमधील मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने आर्थिक मदत केली. मग वीज पुरवठ्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांना आपल्या 2-2, 3-3 महिने पगारासाठी ताटकळत बसावे लागत असल्याबाबद्दलही कामगार संघटनेने यावेळी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

तर अनेक प्रलंबित मागण्यांसाठी जून 2020 पासून अनेक आंदोलने आणि पत्रव्यवहार करूनही अद्याप ऊर्जा खात्याकडून कोणताही निर्णय झालेला नाही. याविरोधात आज राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी काळ्या फिती लावून काम करत असल्याचे मनुचारी यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा