Home कोरोना केडीएमसी कोवीड रुग्णालयातील व्हेंटिलेटरबाबतच्या अहवालाची उच्चस्तरीय चौकशी करा – आमदार राजू पाटील

केडीएमसी कोवीड रुग्णालयातील व्हेंटिलेटरबाबतच्या अहवालाची उच्चस्तरीय चौकशी करा – आमदार राजू पाटील

 

डोंबिवली दि.11 मे :
कल्याण डोंबिवली महापालिका कोवीड रुग्णालयाला पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर सदोष असल्याच्या अहवालाची उच्चस्तरीत चौकशी करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवले असून त्याद्वारे ही मागणी केली आहे.

पीएम केअर फंडामधून केडीएमसीच्या कोवीड रुग्णालयांना 80 व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. गेले वर्षभर या व्हेंटिलेटरद्वारे कोवीड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र गेल्या महिन्यात यापैकी काही व्हेंटिलेटर बंद पडल्याने दुरुस्तीदरम्यान त्यातील काही व्हेंटिलेटर सदोष असल्याचा अहवाल तज्ञ इंजिनिअर्सनी केडीएमसीला दिल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. यावर 100 टक्के प्राणवायू (ऑक्सिजन) दखवत असताना प्रत्यक्षात त्याद्वारे केवळ 53 ते 55 टक्केच पुरवठा होत असल्याचे या अहवालात नमूद असल्याचे सांगत हे व्हेंटिलेटर बसवताना त्याची तपासणी करणे आवश्यक होते असेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेकडून हलगर्जीपणा झाला असून यामूळे ज्या रुग्णांचा जीव गेला असेल त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्नही त्यांनी आरोग्यमंत्र्यांना पाठवलेल्या आपल्या पत्रात उपस्थित केला आहे. राज्यातील इतर रुग्णालयांमध्ये बसवलेल्या व्हेंटिलेटरची तज्ञ व्यक्तींमार्फत तपासण्याची आवश्यकता असल्याचे सांगतानाच या अहवालाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणीही आमदार राजू पाटील यांनी केली आहे .

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा