Home क्राइम वॉच मास्क घातला नाही म्हणून अडवले; बाईकस्वार तरुणाने पोलिस अधिकाऱ्यालाच नेले फरफटत

मास्क घातला नाही म्हणून अडवले; बाईकस्वार तरुणाने पोलिस अधिकाऱ्यालाच नेले फरफटत

कल्याण दि. 21 मे : 
एकीकडे विनाकारण बाहेर पडणाऱ्या आणि मास्क न घालणाऱ्या लोकांवर पोलीस आणि महापालिका प्रशासनाची कारवाई सुरू आहे. अशाच एका कारवाई दरम्यान मास्क घातला नाही म्हणून अडवलेल्या तरुणाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणात घडला आहे. या घटनेत पोलीस अधिकारी जखमी झाला असून मुजोर तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

ब्रेक द चेन अंतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून पोलिसांच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई सुरु आहे. गुरुवारी संध्याकाळी कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा चौकात बाजारपेठ पोलिस ठाण्याचे अधिकारी औदुंबर म्हस्के कर्मचारी पथकासोबत विनाकारण फिरणाऱ्या आणि मास्क न घातलेल्या नागरिकांवर कारवाई करत होते. त्यादरम्यान एक बाईकस्वार मास्क न घालता येताना त्यांना दिसून आला. पोलीस अधिकारी म्हस्के यांनी त्याला थांबविण्याच्या प्रयत्न केला. मात्र तो ना थांबता म्हस्केंना रस्त्यावर फरफटत लांबवर घेऊन गेला. या घटनेत म्हस्के यांच्या डोळ्यासह हाता-पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी मुजोर बाईकस्वार नितीन गायकवाडला ताब्यात घेतले आहे.

१ कॉमेंट

  1. पोलीस पण जास्त अती करतात जेव्हा रमझान चा महिना सुरू होता तेव्हा एक महिना कुंभकर्णाची झोप झोपला होता काय मुस्लिम मोहल्यात अजुन पर्यंत 50%लोक मास्क वापरत नाही मग कोरोना काय हिंदू वस्तीत नाव व पत्ता विचारून येतो काय मी बरेच वेळा पाहिलंय की जेव्हा हिंदूंचे सण येतात तेव्हा हिंदूंना कायदा व सुव्यवस्था चे धडे गिरवत असतात आणि मुस्लिम लोकांचे सण आल्यावर कायदा सुव्यवस्था गवत खायला जाते

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा