Home कोरोना कल्याणच्या आधारवाडी जेलमधील 30 कैद्यांना कोरोनाची लागण

कल्याणच्या आधारवाडी जेलमधील 30 कैद्यांना कोरोनाची लागण

(फाईल फोटो)

कल्याण दि.19 एप्रिल :
कल्याणच्या मध्यवर्ती कारागृहातील 30 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या सर्व कैद्यांना ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती कारागृह अधीक्षकांनी माहिती दिली.
सध्या वाढत्या कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर रविवारी आधारवाडी जेलमधील 350 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 30 कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

या सर्व कैद्यांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले असून कारागृहातील 45 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या कैद्यांचे कोवीड लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तर कोवीड रुग्ण सापडल्यानंतर जेलमध्ये सॅनिटायजेशन करण्यात आले असून उर्वरित सर्व कैद्यांना पोषक आहार देण्यात येत आहे. तर एखाद्या कैद्याला थंडी – ताप आल्यास जेलमध्ये विलगीकरण कक्षही बनवण्यात आला असून कोरोनाची लक्षणे असणाऱ्या कैद्यांना तात्पुरत्या स्वरूपात याठिकाणी ठेवण्यात येते. तसेच डॉन बोस्को शाळेमध्येही विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून नविन कैद्यांना त्याठिकाणी ठेवले जात असल्याची माहिती जेल अधीक्षक ए. सदाफुले यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा