Home ठळक बातम्या बर्फावर 48 मिनिटे नॉनस्टॉप 92 योगासने : डोंबिवलीच्या श्रेयाची जागतिक विक्रमाला गवसणी

बर्फावर 48 मिनिटे नॉनस्टॉप 92 योगासने : डोंबिवलीच्या श्रेयाची जागतिक विक्रमाला गवसणी

 

डोंबिवली दि.8 एप्रिल :
डोंबिवलीच्या मॉडेल इंग्लिश स्कूलच्या श्रेया महादेव शिंदेने डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. श्रेयाने बर्फावर नॉनस्टॉप तब्बल 48 मिनिट 38 सेकंदात 92 योगासने करत नविन जागतिक विक्रमाला गसवणी घातली आहे. श्रेयाच्या या विक्रमाची अखिल भारतीय योगा महासंघाने (ABYM) ‘योगा रेकॉर्ड बुक’मध्ये नोंद केली आहे. श्रेयाची आई वंदना शिंदे आणि बहिण श्रुती शिंदे यांनी कसून सराव घेत अथक परिश्रम घेतले आहेत.
श्रेया दहा वर्षाची असल्यापासून योगा कडे आकर्षित झाली. तसेच तिने अनेक स्पर्धांमधून पदकंही पटकावली असल्याची माहिती मॉडेल शाळेच्या योगाशिक्षका मेघा हर्षद परब यांनी दिली. श्रेयाच्या या विक्रमामुळे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा