Home ठळक बातम्या तब्बल 5 हजार टीबी रुग्ण केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी घेतले दत्तक

तब्बल 5 हजार टीबी रुग्ण केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी घेतले दत्तक

टीबीमुक्त मतदारसंघ उपक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ

कल्याण दि. 10 ऑक्टोबर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा पंधरवडा अंतर्गत टीबीमुक्त भिवंडी लोकसभा उपक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरुवात झाली. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून लोकसभा मतदारसंघातील तब्बल ४ हजार ८५० टीबी रुग्ण दत्तक घेण्यात आले असून त्यांना पुढील सहा महिने मोफत पोषक आहार देण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारतातून टीबी (क्षय) निर्मुलनाचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानुसार देशभरात प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान हाती घेण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भिवंडीतील १०० रुग्ण दत्तक घेतले होते. तसेच या रुग्णांच्या नातेवाईकांना पोषक आहार असलेल्या निक्षय मित्र किट प्रदान करण्यात आल्या होत्या. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील टीबी रुग्णांच्या स्थितीची पाटील यांनी सविस्तर माहिती घेतली. त्यावेळी भिवंडी शहरात २ हजार ४५४, ठाणे ग्रामीण क्षेत्रात १ हजार १०४, बदलापूर नगरपरिषद क्षेत्रात ४५९ आणि कल्याण शहरात ८३३ असे ४ हजार ८५० रुग्ण असल्याचे आढळले. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी स्वत: सर्वच्या सर्व रुग्णांचे पालकत्व स्विकारले. या रुग्णांना कपिल पाटील फाउंडेशनतर्फे पुढील सहा महिने मोफत पोषक आहार दिला जाणार आहे.

या उपक्रमानुसार कपिल पाटील फाउंडेशनतर्फे निक्षय मित्र अभियानासाठी व्हॅन तयार करण्यात आली आहे. या व्हॅनचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत हिरवा झेंडा दाखवून अनावरण केले. तसेच या उपक्रमाचे त्यांनी कौतुकही केले.

भिवंडी लोकसभा मतदारसंघ सहा महिन्यात टीबीमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व टीबी पेशंट दत्तक घेण्यात आले आहेत. देशात प्रथमच टीबीमुक्त होणारा पहिला लोकसभा मतदारसंघ करण्यासाठी माझ्यासह कपिल पाटील फौंडेशनचे कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत, असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.

१ कॉमेंट

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा