Home ठळक बातम्या बारावी परीक्षेत ठाणे जिल्ह्याचा 92 टक्के निकाल; मुरबाड 98 तर कल्याण ग्रामीण...

बारावी परीक्षेत ठाणे जिल्ह्याचा 92 टक्के निकाल; मुरबाड 98 तर कल्याण ग्रामीण 96 टक्के

पुन्हा एकदा मुलींनी मारली बाजी

ठाणे दि.21 मे :
नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात ठाणे जिल्ह्याचा निकाल 92 टक्के इतका लागला असून यंदाही पुन्हा एकदा मुलांपेक्षा मुलींनी यामध्ये बाजी मारली आहे. तर ठाणे जिल्ह्यात मुरबाड आणि कल्याण ग्रामीण भागाचा निकाल हा इतर तालुक्यांपेक्षा सर्वाधिक लागला आहे.(92 percent result of Thane district in 12th examination; Murbad 98 percent while Kalyan Rural 96 percent)

बारावी परीक्षेत ठाणे जिल्ह्यातून तब्बल 97 हजार 662 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 89 हजार 935 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ज्यामध्ये मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 90.23 टक्के तर मुलींचे प्रमाण 94.07 टक्के आहे. तर यामध्ये मुरबाडमध्ये तब्बल 98 तर कल्याण ग्रामीणमध्ये 96 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील आकडेवारी…

कल्याण ग्रामीण – 96.05 टक्के
अंबरनाथ – 92.49
भिवंडी – 89.18
शहापूर – 92.80
ठाणे – 92.41
नवी मुंबई – 93.70
भाईंदर – 93.49
कल्याण डोंबिवली – 90.12
उल्हासनगर – 90.80
भिवंडी – 91.60

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा