Home ठळक बातम्या वाचन संस्कृतीचा जागर करत कल्याणात साजरा झाला अनोखा महिला दिन

वाचन संस्कृतीचा जागर करत कल्याणात साजरा झाला अनोखा महिला दिन

कल्याणात वाचक कट्ट्याचा उपक्रम

कल्याण दि. 5 मार्च :
पुस्तकं आणि वाचनाचे महत्व अधोरेखित करत कल्याणात वाचन संस्कृतीचा जागर करण्यात आला. निमित्त होते ते वाचक कट्ट्यातर्फे आयोजित महिला दिनाच्या (international women’s day) अनोख्या सोहळ्याचे. ज्यामध्ये सहा वर्षांच्या चिमुरडीपासून ते साठ वर्षांच्या आजीबाईपर्यंतच्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

येत्या 8 मार्च रोजी असणाऱ्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वाचक कट्टयातर्फे हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. कल्याण पश्चिमेच्या वसंत व्हॅली परिसरात आयोजित या महिला दिनाच्या सोहळ्यात लहान मुलींपासून ते वयस्कर महिला सहभागी झाल्या होत्या. या सर्वांनी तब्बल एक तास सार्वजनिकरित्या पुस्तकं वाचन करत वाचन संस्कृती जपण्याचा संदेश यावेळी दिला.

पुस्तक वाचन आणि वाचन संस्कृतीच्या प्रचार आणि प्रसाराचे अत्यंत महत्वाचे काम कल्याणातील वाचक कट्टा करत आहे. कल्याणातच राहणाऱ्या विशाल कदम आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुरू केलेल्या या वाचन चळवळीला लोकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, शासकीय अधिकारी आणि सामान्य नागरिक आपली ही वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सहभागी झाले आहेत. वाचक कट्ट्याचे विशाल कदम आणि वाचनप्रेमी महापलिका सचिव संजय जाधव यांच्या संकल्पनेतून आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा झालेल्या या जागतिक महिला दिनाच्या सोहळ्याचे सर्वच जण कौतुक करत आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा