Home ठळक बातम्या राज्यस्तरीय संस्कृत परीक्षेत कल्याणच्या बालक मंदिर संस्थेच्या कॅप्टन रविंद्र माधव हायस्कूलचे मोठे...

राज्यस्तरीय संस्कृत परीक्षेत कल्याणच्या बालक मंदिर संस्थेच्या कॅप्टन रविंद्र माधव हायस्कूलचे मोठे यश

 

कल्याण दि.3 मार्च :
कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक नागपूरद्वारा रवी कीर्ती संस्कृत अध्ययन केंद्र सांगली यांच्यामार्फत फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय संस्कृत परीक्षेत ठाणे जिल्ह्यात कल्याणमधील बालक मंदिर संस्थेच्या कॅप्टन रवींद्र माधव हायस्कूल शाळेतील चार विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून दिक्षा प्रसाद मराठे (राज्यात चौथा क्रमांक), पद्मेश महेश जोगळेकर (राज्यात चौथा क्रमांक),सौम्या मुरलीधर खाडिलकर (राज्यात चौथा क्रमांक), कस्तुरी सचिन निगडे (राज्यात पाचवा क्रमांक) प्राप्त झाले आहेत.

शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक धिरसिंग पवार, उपमुख्याध्यापक उत्तम गायकवाड पर्यवेक्षक दिलीप तडवी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याद्वारे कौतुक करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील संस्कृत शिक्षक मिलिंद खळदकर सर तसेच वैशाली योगेश भोईर मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा