Home ठळक बातम्या शारजा येथील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत डोंबिवलीतील वान्या रावची सुवर्ण कामगिरी

शारजा येथील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत डोंबिवलीतील वान्या रावची सुवर्ण कामगिरी

 

डोंबिवली दि.6 मार्च :
युएई अर्थातच संयुक्त अरब अमिरती येथील शारजामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत डोंबिवलीतील निळजे गावच्या वान्या राव या खेळाडूने भारताकडून खेळताना सुवर्णपदक पटकावत चमकदार कामगिरी केली आहे. शारजा येथील शारजा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये ही आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न झाली. (Vanya Rao of Dombivli wins gold in International Karate Championship in Sharjah)

जगभरातील वीस देशातील तब्बल 1000 हून अधिक कराटेपटू या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. ज्यामध्ये 14 वर्षाखालील गटामध्ये वान्या रावने सुवर्णपदकास गवसणी घातली.

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ही चमकदार कामगिरी करण्यासाठी आपल्याला वर्ल्ड कराटे फेडरेशनचे तांत्रिक सदस्य भारत शर्मा, महाराष्ट्र कराटे असोसिएशनचे अध्यक्ष सलाउद्दीन अंसारी, सचिव संदीप गडे यांच्यासह 14 वर्षाखालील टीम इंडियाचे कोच अनिकेत गुप्ता या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची प्रतिक्रिया वान्या राव हिने दिली.

मागील लेखवाचन संस्कृतीचा जागर करत कल्याणात साजरा झाला अनोखा महिला दिन
पुढील लेखरंगपंचमीपूर्वीच धुळवड : का आले कल्याण डोंबिवलीत धुळीचे वादळ ?

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा