Home ठळक बातम्या मराठी भाषेबद्दल अपशब्द : मनसे पदाधिकाऱ्यांकडून परप्रांतीय फेरीवाल्याला चोप

मराठी भाषेबद्दल अपशब्द : मनसे पदाधिकाऱ्यांकडून परप्रांतीय फेरीवाल्याला चोप

1 ऑक्टोबरच्या रात्री कल्याण स्टेशनवर घडलेला प्रकार

कल्याण दि.2 ऑक्टोबर :
मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरत मराठी तरुणाला शिवीगाळ करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याला मनसे पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला. कल्याण स्टेशन परिसरात 1 ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला होता. त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

कल्याण पूर्वेत राहणाऱ्या तरुणाला स्टेशनच्या स्कायवॉक परिसरात असणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याकडून शिवीगाळ करण्यात आली होती. तसेच मराठी भाषेबद्दलही या फेरीवाल्याने अपशब्द वापरले. याबाबत या तरुणाने कल्याण पूर्वेतील मनसे शाखेशी संपर्क साधत घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यावर मनसे पदाधिकाऱ्यांनी कल्याण स्टेशन गाठत या परप्रांतीय फेरीवाल्याला याबाबत जाब विचारला आणि चोपही दिला. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा