Home ठळक बातम्या जेल नव्हे ही तर झालीत आता सुधारगृह – कल्याण जेलचे अधीक्षक राजाराम...

जेल नव्हे ही तर झालीत आता सुधारगृह – कल्याण जेलचे अधीक्षक राजाराम भोसले

जायंटस् सारख्या सामाजिक संस्थांची होतेय मदत

कल्याण दि.2 ऑक्टोबर :
जेल अर्थातच कारागृहातही चांगली माणसे असतात. रागाच्या भरात त्यांच्याकडून एखादे चुकीचे कृत्य झालेले असते. हे वास्तव विचारात घेऊन सध्या कारागृहाऐवजी आता सुधारगृह ही संकल्पना रुजू लागल्याचे मत कल्याण जिल्हा कारागृहाचे अधीक्षक राजाराम भोसले यांनी व्यक्त केले. जायंटस् वेलफेअर फाऊंडेशनच्या जायंटस् ग्रुप ऑफ कल्याण मिड टाऊनतर्फे आयोजित समाजरत्न पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

सध्या गुन्ह्यांमध्ये कौटुंबिक वादाचे प्रमाण सर्वाधिक असून रागाच्या भरात त्यांच्याकडून हे गून्हे या व्यक्तींना त्याचा प्रचंड पश्चात्ताप होत असतो. अशा वेळी मग आम्हाला जेलर नाही तर सायकोलॉजिस्ट व्हावे लागते. तर येरवडा कारागृहाच्या धर्तीवर कल्याण जेलमध्येही कैद्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. ज्यासाठी जायंटस् सारख्या सामाजिक संस्थांची मोठी मदत होत असल्याचेही भोसले यांनी यावेळी सांगितले.

यावेळी व्यावसायिक क्षेत्राच्या माध्यमातून प्रचंड मोठे सामाजिक कार्य करणाऱ्या रिजन्सी ग्रुपचे सीएमडी महेश अग्रवाल, शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड काम करणारे मनहरलाल ठक्कर, वकीली पेशामध्ये मोठा नावलौकिक प्राप्त केलेल्या ॲड. फैजल काझी आणि पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल एलएनएन न्यूजचे मुख्य संपादक केतन बेटावदकर यांना जायंटस् ग्रुपतर्फे समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

तर समाजरत्न पुरस्कारासोबत यावेळी जायंटस् के सितारेच्या माध्यमातून अनेक जणांनी अतिशय सुंदर अशी गायन, नृत्यकला सादर केली.

यावेळी जायंटस् वेलफेअर फाऊंडेशनचे सेंट्रल कमिटी मेंबर के. नंदकिशोर, गगन जैन, मनोहर पालन, फेडरेशन 1सी चे चेअरमन आशिष खंडेलवाल, कल्याण मिड टाऊनचे अध्यक्ष संजय गुप्ता, जायंटस् के सितारेचे अध्यक्ष किशोर देसाई, एनसीएफ प्रकाश माळी आदी पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा