Home कोरोना 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणापूर्वी होणार ॲन्टीजेन टेस्ट; केडीएमसीचा निर्णय

18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणापूर्वी होणार ॲन्टीजेन टेस्ट; केडीएमसीचा निर्णय

 

कल्याण – डोंबिवली दि.10 मे :
18 ते 44 वयोगटाचे लसीकरण करण्यापूर्वी उपस्थित नागरिकांची अँटीजन टेस्ट करण्याचा निर्णय केडीएमसीने घेतला आहे. कल्याणच्या लालचौकी येथील आर्ट गॅलरी येथील केंद्रावर 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण केले जाते. मात्र उद्यापासून लसीकरणापूर्वी त्यांची अँटीजन टेस्ट करणार असल्याची माहिती केडीएमसी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली आहे.

कल्याणच्या आर्ट गॅलरी लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण सुरू आहे. मात्र याठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची अँटीजन टेस्ट करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली.

 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात उद्या मंगळवारी 11 मे रोजी 45 वर्षांवरील नागरिकांचे कोवॅक्सीनच्या केवळ 2 ऱ्या डोसचे लसीकरण केले जाणार* आहे. तर आर्ट गॅलरी येथील 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरण केंद्रावरही कोवॅक्सीनचाच 1 ला डोस दिला जाणार असल्याची माहिती केडीएमसी प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा