Home कोरोना उद्या 11 मे रोजी 45 वर्षांवरील नागरिकांचे कोवॅक्सीनच्या केवळ 2 ऱ्या डोसचे...

उद्या 11 मे रोजी 45 वर्षांवरील नागरिकांचे कोवॅक्सीनच्या केवळ 2 ऱ्या डोसचे होणार लसीकरण”

 

*”आर्ट गॅलरी येथे लसीकरणापूर्वी होणार अँटीजन टेस्ट – केडीएमसीची माहिती”*

कल्याण-डोंबिवली दि.10 मे :
कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात *उद्या मंगळवारी 11 मे रोजी 45 वर्षांवरील नागरिकांचे कोवॅक्सीनच्या केवळ 2 ऱ्या डोसचे लसीकरण केले जाणार* आहे. तर *आर्ट गॅलरी येथील 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरण केंद्रावरही कोवॅक्सीनचाच 1 ला डोस दिला जाणार असल्याची माहिती केडीएमसी* प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

कोवॅक्सीनचा हा दुसरा डोस *कल्याण पूर्वच्या नेतीवली येथील प्रबोधनकार ठाकरे शाळा लसीकरण केंद्र* आणि डोंबिवली पूर्वेतील *वै. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल लसीकरण केंद्र* या 2 केंद्रांवर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दिला जाणार असल्याची माहिती केडीएमसी प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

त्याचबरोबर 18 ते 44 वर्षे वयोगटासाठी पूर्वीप्रमाणे *कल्याण पश्चिमेतील आर्ट गॅलरी, लाल चौकी* येथे ऑनलाइन स्लॉट बुकिंगनुसार लसीकरण होणार आहे. *त्यापूर्वी डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची अँटीजन टेस्ट केली जाणार असल्याचेही* केडीएमसीतर्फे सांगण्यात आले आहे.

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा