Home ठळक बातम्या कल्याण लोकसभेत शिवसेना आणि युवासेनेच्या निवडणूक निरीक्षकांच्या नियुक्त्या

कल्याण लोकसभेत शिवसेना आणि युवासेनेच्या निवडणूक निरीक्षकांच्या नियुक्त्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त्या जाहीर

डोंबिवली दि.11 एप्रिल :
कल्याण लोकसभेतील ६ विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना तसेच युवासेनेचे विधानसभा निरीक्षक नेमण्यात आले आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने या निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

शिवसेनेतील विधानसभानिहाय निरीक्षक…
यामध्ये कळवा मुंब्रा विधानसभेचे निरीक्षक म्हणून योगेश जानकर, डोंबिवली विधानसभा निरीक्षक म्हणून हेमंत पवार, कल्याण ग्रामीण विधानसभेचे निरीक्षक म्हणून गणेश जाधव, कल्याण पूर्व विधानसभा निरीक्षक म्हणून वामन म्हात्रे, उल्हासनगर विधानसभा निरीक्षक म्हणून प्रभुनाथ भोईर आणि अंबरनाथ विधानसभेचे निरीक्षक म्हणून सुनील वायले यांना जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत विधानसभा क्षेत्रात समन्वयाची, प्रचाराची जबाबदारी या निरीक्षकांवर असणार आहे. शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

त्याचप्रमाणे कल्याण लोकसभेतील ६ विधानसभा मतदारसंघांसाठी युवासेनेच्याही निवडणुक निरीक्षकांच्या विधानसभानिहाय नेमणुका करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

युवासेनेचे विधानसभानिहाय निरीक्षक…
यामध्ये कळवा मुंब्रा विधानसभेत कळव्यात निरीक्षक म्हणून प्रसाद कळसुळे, कळवा मुंब्रा विधानसभेत मुंब्र्यात अशफाक चौधरी, डोंबिवली विधानसभा निरीक्षक म्हणून निखिल वाडेकर, कल्याण ग्रामीण विधानसभेमध्ये विकेश भोईर, कल्याण पूर्व विधानसभा निरीक्षक म्हणून नितेश गजमल, उल्हासनगर विधानसभा निरीक्षक म्हणून हेमंत पमनानी आणि अंबरनाथ विधानसभेसाठी उत्कर्ष आर्या यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत विधानसभा क्षेत्रात समन्वयाची, प्रचाराची जबाबदारी या युवासेना निरीक्षकांवर असणार आहे. युवासेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा