Home ठळक बातम्या कल्याण पूर्वेत मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती

कल्याण पूर्वेत मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती

कल्याण दि.12 एप्रिल :
कल्याण लोकसभेतील142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी जनजागृतीपर कार्यक्रमांची अंमलबजावणी ठिकठिकाणी होत आहे. याचाच एक भाग म्हणून मॉर्निग वॉकला येणाऱ्या नागरिकांमध्ये विविध ठिकाणी मतदान जनजागृती करण्यात आली. या ठिकाणी ध्वनिक्षेपकामार्फत मतदान जनजागृतीपर गीत वाजवून मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले.

142- कल्याण पूर्व विधानसभेच्या स्विप पथकातील (मतदार जनजागृती पथक) महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलवाडी बस डेपोमागील ओपन जिम, खडेगोळवली साकेत कॉलेज , खडेगोळवली 100 फुटी रोड, 9 आय प्रभागक्षेत्र कार्यालयाजवळील नानासाहेब धर्माधिकारी उद्यान येथे हे अभियान राबविण्यात आले. त्याचप्रमाणे राजेश्वरी पार्क सोसायटी, मलंग रोड येथे सोसायटीमधील सभासदांसमोर मतदान जनजागृतीचा कार्यक्रम घेऊन मतदानाची शपथ घेण्यात आली. तसेच अशोकनगर वालधुनी येथे ईद या सणाचे औचित्य साधून अन्सार शेख यांच्या दर्ग्याशेजारीही मतदान जनजागृती कार्यक्रमातून नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

यावेळी प्रणव देसाई, समाधान मोरे, विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, भारती दगळे आणि इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा