Home कोरोना भटक्या प्राण्यांच्या मदतीसाठी डोंबिवलीतील ‘साथी फाउंडेशनची’ साद

भटक्या प्राण्यांच्या मदतीसाठी डोंबिवलीतील ‘साथी फाउंडेशनची’ साद

डोंबिवली दि.30 एप्रिल :
रस्त्यावरील भटक्या प्राण्यांसाठी कार्यरत असणाऱ्या डोंबिवलीतील ‘साथी फाउंडेशन’ने मदतीसाठी आवाहन केले आहे.
रस्त्यावर असणाऱ्या कुत्रा, मांजर आदी भटक्या प्राण्यांच्या मदतीसाठी डोंबिवलीतील आकाश वेदक या तरुणासह त्याचे मित्र अमन सोनी, धवल सोनी, निलेश सोनी आणि रचित देढीया आदी मित्रांनी एकत्र येत ‘साथी फाउंडेशन’ ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून गेल्यावर्षी लॉकडाऊन काळात सलग 120 दिवस 400 च्या आसपास भटके कुत्रे, मांजरी यांच्या खाण्याची व्यवस्था करण्यात आली. सध्या पुन्हा एकदा अशा भटक्या प्राण्यांच्या खाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून लोकांनी जमेल तशी मदत करण्याचे आवाहन आकाश वेदक यांनी केले आहे.

मदतीसाठी संपर्क – 99300 13926

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा