Home कोरोना डोंबिवलीत कोवीड मेडीकल किटसह जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप

डोंबिवलीत कोवीड मेडीकल किटसह जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप

 

डोंबिवली दि.30 एप्रिल :
कोवीडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली पश्चिमेतील महाराष्ट्र नगर आणि देवीचा पाडा प्रभागातील नागरिकांना मोफत कोवीड मेडीकल किटसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. स्थानिक लोकप्रतिनिधी वामन म्हात्रे, अनमोल वामन म्हात्रे , गोरखनाथ म्हात्रे आदींकडून हा उपक्रम राबविण्यात आला.

वाटप करण्यात आलेल्या कोवीड मेडीकल किटमध्ये तपासणी यंत्र, २०० थर्मल गन, २०० ऑक्सिमीटर,१५ हजार एन ९५ मास्क 15 हजार इम्युनिटी चहा पावडरच्या पुड्यांसह, तांदूळ -डाळ आदी जीवनावश्यक वस्तूंचेही वाटप करण्यात आले. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या उपक्रमानूसार ‘माझा प्रभाग माझी जबाबदारी’ या उद्देशाने हा उपक्रम राबवल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनमोल म्हात्रे यांनी दिली.
या उपक्रमासह विष्णूनगर पोलिस ठाण्यातही हँडसॅनिटीझर आणि 200 एन ९५ मास्कचे वाटप करण्यात आले. तर डोंबिवली पश्चिम स्टेशन परिसरातील सर्व रिक्षा संघटना आणि रिक्षा युनियनच्या सर्व रिक्षा सॅनिटाईज करण्यासह रिक्षा चालकांनाही रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी इम्युनिटी चहाचे वाटप करण्यात आले.

मागील लेखभटक्या प्राण्यांच्या मदतीसाठी डोंबिवलीतील ‘साथी फाउंडेशनची’ साद
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 819 रुग्ण तर 1 हजार 155 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा