Home ठळक बातम्या श्री स्वामी सेवा केंद्र गांधारेतर्फे आदिवासी बांधवांसोबत दिवाळी सण साजरा

श्री स्वामी सेवा केंद्र गांधारेतर्फे आदिवासी बांधवांसोबत दिवाळी सण साजरा

 

कल्याण दि. ३१ ऑक्टोबर :

कल्याण पश्चिम येथील सापाड गावातील आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा सण साजरा करण्यात आला. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरअंतर्गत महिला सक्षमीकरण आणि आरोग्य दूत विभागामार्फत एक हात मदतीचा श्री जनसेवा या योजनेंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला.

गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे 20% अध्यात्म आणि ८० टक्के समाजकारण या तत्त्वानुसार न्यू कल्याण केंद्र,गांधारेतर्फे आदिवासी पाड्यावर दिवाळीनिमित्त अन्नदान आणि वस्त्रदान करण्यात आले. श्री जनसेवा योजनेअंतर्गत समाजातील विविध उपेक्षित बांधवांसाठी असे सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती स्वाती पाचघरे यांनी दिली.

यावेळी न्यु कल्याण केंद्रातील कल्पना पष्टे, अक्षदा भोंडीवले, वासंती महाजन , समिर पष्टे, स्वाती पाचघरे, संज्योत पाचघरे आणि इतर सेवेकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा