Home कोरोना हॉटेल-रेस्टॉरंट आणि बारमधील कर्मचाऱ्यांची कोवीड चाचणी बंधनकारक – केडीएमसीने काढले आदेश

हॉटेल-रेस्टॉरंट आणि बारमधील कर्मचाऱ्यांची कोवीड चाचणी बंधनकारक – केडीएमसीने काढले आदेश

 

कल्याण-डोंबिवली दि.23 मार्च :
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसत असताना केडीएमसी प्रशासनही पुन्हा एकदा विविध उपाययोजना राबवताना दिसत आहे. परिणामी कल्याण डोंबिवलीतील हॉटेल्स-रेस्टॉरंट आणि बारमधील कर्मचाऱ्यांची स्वखर्चाने कोवीड टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Covid test mandatory for hotel-restaurant and bar employees – KDMC issues orders)

कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा लक्षणीयरीत्या वाढत असताना दुसरीकडे शहरांतील हॉटेल्स-रेस्टॉरंट आणि बारमध्येही मोठी गर्दी होत आहे. अशावेळी संबंधित हॉटेल्स-रेस्टॉरंट आणि बारमधील एखादा कर्मचारी कोरोनाबाधित असल्यास ग्राहकांनाही त्याची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका क्षेत्रातील सर्व हॉटेल्स-रेस्टॉरंट आणि बारमधील कर्मचाऱ्यांची कोवीड टेस्ट करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

सोमवारपासून (22 मार्च 2021) पुढील 7 दिवसांच्या आत स्वखर्चाने ही चाचणी करणे बंधनकारक केली असून त्याचा अहवाल moh.kdmc@gmail.com या ईमेलवर पाठवायचा आहे. तसेच सर्व प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील हॉटेल्स-रेस्टॉरंट आणि बारला भेट देऊन याबाबत खातरजमा करण्याचे आणि जे हॉटेल्स-रेस्टॉरंट आणि बारचालक याचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा