Home ठळक बातम्या ‘आयत्या बिळावर नागोबा’ होण्याची मनसेची जुनीच खोड – वडवली पुलावरून आमदार विश्वनाथ...

‘आयत्या बिळावर नागोबा’ होण्याची मनसेची जुनीच खोड – वडवली पुलावरून आमदार विश्वनाथ भोईर यांची टिका

कल्याण दि.23 मार्च :
कल्याणच्या वडवली पुलाचे मनसेने लोकार्पण केल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. ‘आयत्या बिळावर नागोबा’ होण्याची मनसेची ही जुनीच खोड असल्याची खरमरीत टिका कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे. (MLA Vishwanath Bhoir’s criticism on MNS over Vadavalli bridge)

वडवली -आंबिवलीला जोडणाऱ्या रेल्वे फाटकावरील उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाले असून सोमवारी त्याचे लोकार्पण केले जाणार होते. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. नेमकी हीच संधी साधत मनसेने काल संध्याकाळी गनिमीकाव्याने हा पूल वाहतुकीसाठी खुला केला. यावरून शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी मनसेवर निशाणा साधत शिवसेनेच्या कामाचे श्रेय घ्यायचे ही मनसे आमदार राजू पाटील यांची जुनी सवय असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच केवळ लोकांचे लक्ष वेधण्यासाठी मनसेने केलेला हा स्टंट असल्याचेही आमदार भोईर यावेळी म्हणाले. हा उड्डाणपूल पूर्ण करण्यासाठी भूसंपादनाचा महत्वाची अडचण होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. तर मनसे एवढे दिवस काय झोपा काढत होती का? 12 वर्षे कोणतेही आंदोलन नाही की पत्रव्यवहार नाही. शिवसेनेने केलेल्या कामाचे श्रेय घ्यायचे ही त्यांची जुनीच खोड असल्याचे सांगत आमदार विश्वनाथ भोईर यांनी मनसेवर हल्ला चढवला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा