Home ठळक बातम्या डोंबिवलीतील भोपर गावात आढळला आफ्रिकेतील दुर्मिळ रणगोजा (Desert Wheatear) पक्षी

डोंबिवलीतील भोपर गावात आढळला आफ्रिकेतील दुर्मिळ रणगोजा (Desert Wheatear) पक्षी

पक्षी निरीक्षक डॉ. महेश पाटील यांनी कॅमेऱ्यात केले कैद

डोंबिवली दि.1 मार्च :
कल्याणच्या रींगरोड परिसरात दुर्मिळ प्राच्य शिंगाळा घुबड आढळले असतानाच आता डोंबिवलीच्या भोपर गावात दक्षिण आफ्रिकेतील दुर्मिळ रणगोजा म्हणजेच Desert Wheatear पक्षी आढळून आला आहे. पक्षी निरीक्षक आणि आहार तज्ञ डॉ. महेश पाटील यांना या देखण्या पक्षाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यात यश आले आहे.

तब्बल 5 हजार किलोमीटरचे अंतर कापून डोंबिवलीमध्ये दाखल…

नेहमीप्रमाणे डॉ. महेश पाटील हे भोपर गावात फेरफटका मारत होते. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास हा दुर्मिळ पक्षी दिसला. अतिशय चपळ असणाऱ्या या रणगोजा (Desert Wheatear) पक्षाचे दक्षिण आफ्रिकेचे (south africa) सुप्रसिद्ध सहारा वाळवंट (sahara Desert) मूळ निवासस्थान. या ठिकाणाहून हा रणगोजा (Desert Wheatear) पक्षी तब्बल 5 हजार किलोमीटरचे अंतर कापून डोंबिवलीमध्ये आलाय. विशेष म्हणजे त्याचा आकार आणि रंग हा आपल्याकडील चिमणीप्रमाणेच आहे. दरवर्षी हिवाळ्याच्या दिवसांत हा चिमुकला मात्र तितकाच कणखर पक्षी हजारो किलोमीटर अंतर कापून भारतात दाखल होत असल्याची माहिती पक्षी निरीक्षक डॉ. महेश पाटील यांनी एलएनएनशी बोलताना दिली.

तर साधारणपणे मार्च अखेरीपर्यंत रणगोजा (Desert Wheatear) चा आपल्याकडे मुक्काम असतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा इवलासा पक्षी आपल्या मूळ ठिकाणच्या दिशेने गरुडझेप (त्याच्या इवल्याशा आकारापुढे तो कापत असलेल्या अंतरामूळे गरुड झेपेशिवाय दुसरा योग्य शब्द नाही) घेत असल्याचेही डॉ. महेश पाटील यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा