Home ठळक बातम्या कल्याणातील शालेय विद्यार्थी-शिक्षकांना अग्निशमन दलाकडून प्राथमिक धडे

कल्याणातील शालेय विद्यार्थी-शिक्षकांना अग्निशमन दलाकडून प्राथमिक धडे

 

कल्याण दि.1 मार्च :
अग्निशमन दलाबाबत आणि त्याच्या कामाबाबत सामान्य नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता असते. या पार्श्वभूमीवर कल्याणातील विविध शाळांचे विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी केडीएमसी अग्निशमन दलाच्या आधारवाडी मुख्यालयाला भेट देऊन माहिती घेत आहेत.

कल्याण डोंबिवली महानगपालिकेचा अग्निशमन विभाग हा नेहमीच आगीच्या संकटात, पूरपरिस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून वाचवण्याचे जोखमीचे काम करीत असतात. त्यामूळे लहान मुले असो की प्रौढ व्यक्ती सर्वानाच अग्निशमन दलाबाबत नेहमीच कुतूहल वाटत असते. त्यामूळे अग्निशमन दलाचे काम जाणून घेण्यासह या भेटीमध्ये शाळेकडून प्राथमिक माहिती जाणून घेतली जात आहे.

 

आग प्रतिबंधक नियंत्रणाबाबत प्राथमिक स्तरावर कोणती दक्षता घेणे आवश्यक आहे, अग्निशमन दल येईपर्यंत सामान्य नागरिक कोणत्या उपाय योजना करू शकतात, आग लागल्यावर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दल काय प्रयत्न करते आदी प्रश्नांवर अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.

यावेळी केडीएमसीचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी, विभागीय अधिकारी दामोदर वांगड, सब ऑफिसर भाऊसाहेब पगार आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा