Home ठळक बातम्या कपिल पाटील यांच्यासाठी 2 लाखांच्या मताधिक्क्याचा निर्धार; कल्याण पश्चिमेत महायुतीने कसली कंबर

कपिल पाटील यांच्यासाठी 2 लाखांच्या मताधिक्क्याचा निर्धार; कल्याण पश्चिमेत महायुतीने कसली कंबर

नरेंद्र पवार यांच्याकडून मायक्रो प्लॅनिंग, एकाच दिवशी घेण्यात आल्या तब्बल 38 वार्डांच्या बैठका

कल्याण दि.24 एप्रिल :
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कपिल पाटील यांच्या विजयासाठी कल्याण पश्चिमेतून 2 लाखांहून अधिक मतधिक्क्याचा निर्धार महायुतीने केला आहे. नुकत्याच झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात भाजपचे माजी आमदार आणि कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुक प्रमूख नरेंद्र पवार यांनी हा विडा उचलला असून या 2 लाखांहून अधिक मताधिक्याच्या दिशेने महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे.(Determination of 2 lakh votes for Kapil Patil; What is the waistline of Mahayuti in Kalyan West)

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना भाजपकडून भिवंडी लोकसभेसाठी सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली असून यापूर्वीच्या त्यांच्या दोन्ही विजयांमध्ये कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या दोन्ही वेळेला कल्याणकरांनी कपिल पाटील यांच्या पारड्यात भरभरून मते देत त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला आहे. तर यंदा कपिल पाटील यांच्या विजयाची केवळ हॅटट्रिक नव्हे तर रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून देण्याचा निर्धार भाजपसह शिवसेना, मनसे, आरपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस, लहुजी संघटना या महायुतीने केला असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार आणि कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुक प्रमूख नरेंद्र पवार यांनी दिली आहे.

याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिमेमध्ये माजी आमदार नरेंद्र पवार, विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह माजी आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे, प्रकाश भोईर यांनी एकत्रितपणे अतिशय जोरदार तयारी सुरू केली आहे. तर आम्ही केवळ तयारी सुरू केली नाहीये तर आमच्या विजयासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टी लक्षात घेऊन त्यादृष्टीने मायक्रो प्लॅनिंग करीत असल्याचेही नरेंद्र पवार यांनी स्पष्ट केले. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिमेत येणाऱ्या 38 प्रभागातील कार्यकर्त्यांची बैठका घेण्यात येत आहेत. या सर्व बैठका महायुतीतील इतर घटक पक्षांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात येत असून त्यामध्ये कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन केले जात असल्याचेही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान 2 लाख मताधिक्क्याच्या निर्धाराला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भाजपसह महायुतीतील इतर घटक पक्षांनी जोरदार कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा