डोंबिवली दि.24 एप्रिल :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात डोंबिवलीमध्ये युवासेनेतर्फे आदित्य ठाकरेंविरोधात युवासेनेकडून आज जोडमार आंदोलन करण्यात आले. डोंबिवली पूर्वेतील शिवसेना शाखेबाहेर युवासेनेच्या संतप्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला. (Statement about Chief Minister Eknath Shinde: Yuva Sena’s protest against Aditya Thackeray in Dombivli)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध केला जात आहे. तर आज डोंबिवलीतही आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्याविरोधात पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. युवासेनेकडून आदित्य ठाकरे यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यासह त्यावर चोखणी लावत युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला.
तसेच आमच्या कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी जे काही वक्तव्य केलं त्याचा करावा तितका निषेध कमीच आहे. आदित्य ठाकरे यांनी आपले आजोबा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार घेण्याऐवजी महाराष्ट्रात टोमणेसम्राट नावाने प्रसिद्ध असलेल्या आपल्या वडिलांचे संस्कार घेतल्याची जहरी टीकाही युवासेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत आणि त्यासाठी युवासेना त्यांच्या पाठीशी उभी राहील आणि आदित्य ठाकरेंसारख्या गैरवर्तन करणाऱ्यांना चोख उत्तर देईल अशी प्रतिक्रियाही यावेळी युवासेना पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.